श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा.. 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा..

 

पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील

 

पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ (हलवाई गणपती या संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे एकूणच या क्षेत्राचा एकूणच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होणार आहे.” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, ‘अ वर्ग पर्यटन स्थळांना विकास, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी (रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे) सरकारकडून विशेष निधी दिला जातो. त्याद्वारे, पर्यटकांसाठी निवास, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दर्जेदार सुविधा निर्माण केल्या जातात. त्याद्वारे स्थानिक रोजगारनिर्मितीलाही चालना मिळते. असंख्य भक्तांच्या लाडक्या श्री दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानला ‘अ’ वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाल्यामुळे देवस्थान आणि परिसराचा विविधांगी विकास होणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात विविध सुविधांची एकाच ठिकाणी असाव्यात यासाठी इमारत उभारण्यासाठी नियोजित जागेचे विधिवत भूमिपूजन ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या विविध सेवांमध्ये स्वछता गृह, मातांसाठी स्तनपान केंद्र, लगेज काउंटर, चपल स्टॅन्ड, सुरक्षा केंद्र, मोबाईल डिपॉझीटी काउंटर, प्रशासकीय कार्यालय, इन्फॉर्मेशन सेंटर, प्रथम उपचार सुविधा असणार आहेत.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!