“दप्तरही आणि अभ्यासाचे टेबलही; विद्यार्थिनींसाठी अनोखा शैक्षणिक उपक्रम”, “ना. जयकुमार रावलांच्या संकल्पनेतून विद्यार्थिनींना मोठी भेट; १००० मुलींना ‘दप्तर डेस्क’चे वाटप”


  • दोंडाईचा-

✍️श्री. पांडुरंग शिंपी (प्रतिनिधि)

विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि त्यांना अधिक सुलभ व आरामदायी पद्धतीने अभ्यास करता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून दोंडाईचा येथे ‘दप्तर डेस्क’ वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेच्या राणी माँ साहेब मनुबादेवी रावल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सुमारे १ हजार विद्यार्थिनींना ‘दप्तर डेस्क’चे वितरण करण्यात आले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच हा उपक्रम राबविण्यात आल्याने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘दप्तर डेस्क’ हे दप्तर आणि अभ्यासासाठी टेबल अशा दुहेरी उपयोगाचे साधन असून विद्यार्थिनींना घरी किंवा अन्यत्र बसून योग्य पद्धतीने अभ्यास करण्यास त्याचा लाभ होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज तसेच सरस्वती देवी यांच्या प्रतिमांच्या पूजनाने झाली. यावेळी रोटरीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. मुकुंद सोनी, रामेश्वर इंदानी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती मुकेश देवरे, आरोग्य सभापती छोटू सोनवणे, नगरसेवक सुभाष धनगर, अक्षय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भिकन बागवान, जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती एस. एन. पाटील होत्या.

यावेळी प्रविण महाजन यांनी ‘दप्तर डेस्क’च्या उपयुक्ततेविषयी माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान Narendra Modi यांनी सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. त्याच धर्तीवर मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना हे उपयुक्त साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे दप्तर वाहून नेण्यास सोयीचे असून अभ्यासासाठी टेबल म्हणूनही वापरता येते. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात हुसेन विरदेलवाला यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्राचार्या एस. एन. पाटील यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व उपक्रमशील योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. के. गिरासे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एच. बी. राजपूत यांनी मानले. उपक्रमाबद्दल पालक, शाळा प्रशासन तसेच संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, सचिव सी. एन. राजपूत, शालेय प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, सहसचिव आर. टी. गिरासे, डी. एन. जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!