दोंडाईचा शहरात पेट्रोलपंपावर डिझेल पेट्रोल साठा…. ड्रम मध्ये भरण्यासाठी नागरीकांची झुबंड
दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी नागरीकाची प्रचंड गर्दी असुन ही गर्दी म्हणजे डिझेल व पेट्रोल पुढे लवकर मिळणार नाही असे युद्धामुळे बातम्या येत असुन नागरीक डिझेलच्या साठा जे मिळेल ते मोठे मोठे ड्रम मध्ये साठा आपल्या वाहनात टाकण्यासाठी करून आपल्या जवळ वाहन चालवण्यासाठी पेट्रोल पंपावर लाईन लावत असुन डिझेल साठी ड्रम लावुन लांब लाब रागा नागरिक लावत असुन त्यांत गर्दी मध्येच मोठे वाहन ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेपो, चालक वाहन सुद्धा गर्दी करून डिझेल भरायला येत असुन अगोदर पासून ड्रम लावून नंबर लावणारे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे डिझेल घेण्यासाठी ड्रम मध्ये नंबर लावुन भरारण्यासाठी स्टेशन भागातील जिनवाला पेट्रोल पंपावर आलेले नागरिकांनी दि.१८ रोजी रात्री नऊ वाजता वाढत्या गर्दीमुळे फारच भांडणे झाली असुन भांडणात नागरिक एकमेकावर धावुन जात होते अश्या भांडणात काही अर्नथ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट द्यावी किंवा एखाद्या पोलीसाची नियुक्ती त्याठिकाणी करावी जेणेकरून भांडण होऊन काही अनर्थ होणार नाही.

अशी अनेक नागरिकांची मागणी असुन शहरातील सर्व पेट्रोल पंपावर आमच्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता काही पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल शिल्लक नसल्याने बंद दिसुन आले तर काही ठिकाणी मोटार सायकल ट्रक टेम्पो च्या रागा लावलेल्या दिसुन आल्या तरी शहरातील पेट्रोल डिझेल होणारी ताराबंळ थाबेल का ?
✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा








