लालपरीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त सरकार साहेब रावल यांच्या हस्ते दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण


दोंडाईचा – (प्रतिनिधी श्री पांडुरंग शिंपी)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन आगार व्यवस्थापक मिलिंद परदेसी इ मान्यवर उपस्थित होते.

सरकार साहेब रावल यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीने आपल्या भविष्यकाळातील संकट ओळखुन किमान ५ वृक्ष लागवड केली पाहिजे दिवसेंदिवस उन्हाळ्यात तापमान वाढत असुन त्यासाठी एकमेव पर्याय असुन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन परिसरातील तापमानवाढीवर नियंत्रण करता येईल . प्रविण महाजन यांनी सांगितले की मा ना जयकुमार भाऊ रावल यांच्या संकल्पनेतून दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो वृक्ष लागवड करण्यात येते सरकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मालपुर रोडवरील वनविभागाच्या जागेत भव्य आँक्सिजन पार्क उभारण्यात येत असुन सर्व दोंडाईचा व परिसरातील नागरीकांनी आपल्या सोयीने तेथे जाऊन वृक्षारोपण करावे तसेच मा ना जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोईसाठी दोंडाईचा आगारात नविन जिजाऊ व वातानुकूलित शिवाई बसेस यांचा समावेश होणार आहे .

आगार व्यवस्थापक मिलिंद परदेसी यांनी दोंडाईचा बस आगारात दरवर्षी सातत्याने वृक्षारोपण करुन दाट झाडी तयार करण्यात आल्याचे सांगितले तसेच यावर्षी उपलब्ध जागेत जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यात येईल असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाहतुक निरिक्षक सुनिल भाबड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!