दोंडाईचा – येथील राऊळ दौलतसिंहजी बहुउद्देशीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेचे इ १२वी परीक्षा उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व १२ वी नंतर भविष्यातील वाटचाली शिबिराचे आयोजन स्वो.वि.संस्थेचे,आर.डी.एम.पी.हायस्कूल व ज्यू.कॉलेज, दोंडाईचा येथे सकाळी करण्यात आले.
स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष मा.श्रीमान सरकारसाहेब रावल व माननिय नामदार श्रीमान जयकुमारभाऊ रावल, कॅबिनेट मंत्री यांनी कार्यक्रम आयोजन बाबत मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्याना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाला उपस्थित आर.डी.एम.पी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस के चंदने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.जी.वाय.बोरसे, तसेच जयकुमार रावल इनस्टीट्युट ऑफ टेक्नालॉजी प्राचार्य डी. एम. पटेल, दादासाहेव रावल फार्मसी कॉलेज घनश्याम चव्हाण, विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविद्यालय प्राचार्य व्ही.एस. गिरासे, दादासाहेब रावल महाविद्यालय उप प्राचार्य के.के कापडणे, एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. झेड. झांबरे,नर्सिंग कॉलेज अकाउंटंट अमित गिरासे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा जे.एच.गिरासे, प्रा एच् आर भावसार,सर्व प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी बारावी नंतर विविध करियर च्या पर्यायां संदर्भातील व प्रवेश प्रक्रिये संबंधी मार्गदर्शन दादासाहेब रावल नॉलेज सिटी येथील विविध शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी केले. तसेच विद्यार्थिनी दर्शना इशी हिने आपले अनुभव कथन केले.ऊत्तीर्ण विद्यार्थीनी भुमिका सोनवणे हिने मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम ५ आलेले गुणवंत विद्यार्थी 1) हितेश आप्पा गिरासे 86.17% (517/600)
2) लक्ष प्रशांत राजपूत 85.00% .(510/600)
3) दर्शन दिनेश मिस्तरी 84.83% (509/600)
3) कार्तिक गोकुळ पाटील 84.83% (509/600)
4) भूमिका चंद्रशेखर सोनवणे 84.50% (507/600)
4) तनुश्री विशाल जाधव 84.50% (507/600)
5) प्रणव नवनीत पवार 84.33% (506/600)
5) अनुजा महेंद्रसिंग सोलंकी 84.33% (506/600)
5) दिव्यांका लोटनसिंग गिरासे 84.33% (506/600)
सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले.संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान सरकारसाहेबजी रावल, संस्थेचे मानद सचिव तथा महाराष्ट्र राज्य चे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, आदरणीय जयकुमारभाऊजी रावल, संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री सी एन भाऊसाहेब, संस्थेचे शालेय प्रशासन सचिव मा. भाऊसाहेब श्री ललितसिंहजी गिरासे, सहाय्यक सचिव.श्री. डी.एन जाधव,संस्थेचे विकास अधिकारी श्री.आर टी गिरासे,प्राचार्य श्री एस के चंदने, शाळेचे उपमुख्याध्यापिका श्रीम. बी सी भावे, पर्यवेक्षक श्री बी एस सिसोदिया,ज्यू कॉलेज विभाग प्रमुख श्री जे एच गिरासे, उपस्थित सर्व शिक्षक डी के सोनवणे, एस डी पाटील, एस डी जाधव, मोहसीन मिर्झा, सदाराव, बंजारा, आव्हाड, ईशी मॅडम, वाघमारे, तसेच शिक्षकेतर बंधू भगिनी सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून हार्दिक अभिनंदन केले.तसेच
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे एच गिरासे व आभार प्रदर्शन प्रा जी एस. पिंपळिसकर यांनी केले.








