पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्याच निवडणुका; बुधवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; ३ टप्प्यात हाणार निवडणुका…
नगरपालिकांच्या प्रभागांचे, नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता मतदार यादी देखील अंतिम झाली आह. पाहेल्या टप्प्यात राज्यातोल २८९ नगरपालिका, नगरपरिषदा-नगरपंचायतींच्याच निवडणुका
घेण्याचे निश्चित झाले आहे.
या पार्श्भूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे. त्यादिवशीच निवडणुकीची आचारसंहिता लागेल, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.
राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ ंचायत समित्या आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका ३१ जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची संपूर्ण तयारी झाली आहे तर महापालिकेच्या प्रभाग व महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे तीन टप्यातील निवडणुकांसाठी ८५ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम २१ ते २५ दिवसांचा असणार आहे. दुसऱ्या टप्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होतील, असे नियोजन आयोगाचे आहे. राज्यातील नऊ कोटींडून अधिक मतदार या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावतील, असेही सूत्रांनी सांगितले,
निवडणुकीचे संभाव्य तीन टप्पे असे..
२८९ नगरपालेका -२१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम
३२ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्या- ३० ते ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम२५ते ३० दिवसांचा निवडणूक कायेक्रम
२९ महापालिका- २५ते ३० दिवसांचा निवडणूक कायेक्रम
तसेच सलग ३ महिने सलग असणार आचारसंहिता असण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी २१ दिवस ते ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असणार आहे. साडेतीन वर्षापूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य सस्थाच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेरीपर्यत डेडलाईन दिली आहे. त्यामुळे ५ नोव्हेंबरनंतर तिन्ही टप्यातील निवडणुका ८६ ते ८७ दिवसांत घ्याव्या लागणार आहेत. त्यात पुन्हा सुट्ट्यांचे दिवस असतील. या पार्श्वभूमीवर सलग ३ महिने या निवडणूकार्ची आचारसंहिता लागू शकते, असेही सूत्रांनी सांगितले
मुख्य संपादक जतीन बोरसे









