दोंडाईचा- भोई समाज तर्फे संत शिरोमणी भीमा भोई जयंती निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न


दोंडाईचा शहर भोई समाज तर्फे संत शिरोमणी भीमा भोई जयंती निमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

 

आज 25 मे रोजी संत शिरोमणी भीमा भोई 175 वी जयंती निम्मित दोंडाईचा शहर भोई समाजाच्या वतीने नवाभोई वाडा येथे प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात सर्व समाज बांधव, माता बघिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाला दोंडाईचा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आबासाहेब श्री विजय पाटील,दोंडाईचा शहर भाजपा चे अध्यक्ष श्री जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, आरोग्य सभापती छोटू सोनवणे, नगरसेवक विजय मराठे, कृष्णा नगराळे, भैया धनगर, जितेंद्र गिरासे सर, चतुर पाटील,संजोग रामोळे,रामभाऊ माणिक, राकेश अग्रवाल,मनोज तेले, माजी नगरसेवक संजय तावडे, कैलास वाडिले सर, शैलेश नागरे, अनिकेत आव्हाड उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवातीला प्रतिमा पूजन उपनगराध्यक्ष श्री विजय पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश वाडिले सर, सर्व नगरसेवक व समाज बांधवा मार्फत करण्यात आले. एका हाकेवर सदैव साथ देणारे सर्वच नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते मित्र गण यांचा भोई समाज दोंडाईचा यांच्या वतीने सत्कार आला.

कार्यक्रमात भाजपा चे शहर अध्यक्ष जितेद्र गिरासे यांनी *विकासरत्न आदरणीय मा.सरकारसाहेबजी रावल,माँ साहेब नयनकुंवरजी रावल, पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री जयकुमारजी रावल यांच्या तर्फे शुभेच्छा व्यक्त केल्यात.* श्री विजयभाऊ मराठे व श्री कृष्णा नगराळे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले व सर्व भोई समाज बांधवाना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश वाडिले सर यांनी देखील उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल भोई, प्रास्ताविक श्री संजोग रामोळे सर व आभार प्रदर्शन श्री कैलास वाडिले सर यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन संजोग रामोळे, राज ढोले, रवींद्र जावरे,संदीप रामोळे, आप्पा लांबोळे सर,जयेश तावडे, हिमांशू फुलपगारे,ललित तावडे, मनोज रामोळे, निलेश सटोटे, दिपक वाडिले, कमलेश रामोळे,विशाल निकवाडे, हेमंत रामोळे, नंदलाल वाडिले,हेमंत तावडे यांनी केले.

 

समाजाचे जेष्ठ म्हणून श्री मधुकर तावडे, तुकाराम वाडिले, प्रभाकर तावडे, दिलीप रामोळे, सीताराम वाडिले,कैलास तमखाने,वसंत साटोटे सर,सुकदेव रामोळे,राजाराम भोई, सुधाकर वाडिले,आनंदा भोई, यांची प्रमुख उपस्थिती होती.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!