धुळे जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असून बेमोसमी पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस, मका , कांदा अश्या अनेक पिकांसह फळ पिकांचे मोठे नुकसान झाले असून धुळे जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 48 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिक बाधित झाली आहेत. यात सर्वाधिक नुकसान हे शिंदखेडा तालुक्यात झालं असून 122 गावातील शेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बेमोसमी पावसाचा फटका बसला आहे. दरम्यान कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात येत असून पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे..
Views: 201









