पंडित नेहरू विद्यालयात संविधान दिवस साजरा


पंडित नेहरू विद्यालयात संविधान दिवस साजरा..!

आज दिनांक २६ नोव्हेंबर बुधवार रोजी धुळे जिल्ह्यातील ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित पंडित नेहरू सह. शेती विद्यालय नवलनगर येथे ७५ वा संविधान दिवस मुख्याध्यापक श्री यु. बी. पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला, याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. जी. नेरकर व श्री. आर. टी. अहिरे यांनी “संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा” कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला सहभागी विद्यार्थ्यांना “संक्षिप्त संविधान पुस्तिका व पेन” बक्षीस देखील यावेळी देण्यात आले. श्री. आर.टी. अहिरे यांनी संविधानाविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली.

यावेळी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन. आर.गोसावी, श्री. एस. जे. बोरसे, श्री. जी. झेड. चौधरी, श्री. डी. एन. पाटील व श्री. व्ही. के. वाघ इत्यादी मान्यवर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते,  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर. एस. ठाकरे यांनी केले तर मान्यवरांचे आभार सौ. व्ही. पी. देसले यांनी मानले.

मुख्य संपादक जतीन बोरसे, शिंदखेडा


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!