दोंडाईचा (प्रतिनिधी ) –
स्वो. वि. संस्थेचे आर. डी. एम. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दोंडाईचा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. श्री. एस. के. चंदने सर होते प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या भावे मॅडम, पर्यवेक्षक श्री. भारत सिसोदिया, श्री. के. पी. गिरासे, विज्ञान विभाग प्रमुख श्री. जे. एच. गिरासे हे होते, तसेच यावेळी श्री. डी. के. सोनवणे, श्री. डी. डी. गिरासे, श्री. एस. डी. पाटील, श्री. सदाराव, श्री. बंजारा, श्री. प्रशांत भामरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना श्री. जे. एच. गिरासे सर, श्री. डी. के. सोनवणे सर व श्री. आर. ए. पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विज्ञानामुळे मानवी जीवनात झालेली प्रगती, संशोधनाची गरज आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला.
यावेळी मा. प्राचार्य बापूसाहेब श्री. एस. के. चंदने सर यांनी विज्ञानाचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या काव्यमय सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.









