‘सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र’ संघटनेचा विस्तार; धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शिबान अहमद यांची नियुक्ती!


दोंडाईचा: गेल्या पाच वर्षांपासून समाजहिताचे विविध लढे यशस्वीपणे लढल्यानंतर, आता ‘सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र’ ही संघटना एका अधिकृत आणि व्यापक स्वरूपात कार्यान्वित झाली आहे. संघटनेच्या विस्तार प्रक्रियेला वेग आला असून नुकत्याच नवीन कार्यकारिणीतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

यामध्ये दोंडाईचा वरवाडे नगरपालिकाचे नगरसेवक शिबान अहमद यांची धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यात संघटनेचे जाळे अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

युवकांसाठी नवे व्यासपीठ

केवळ गर्दीचा भाग न होता समाजाचे खंबीर नेतृत्व करणारी ‘वज्रमूठ’ निर्माण करणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. समाजाच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या अभ्यासू तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही संघटना कटीबद्ध आहे.

संघटनेची मुख्य उद्दिष्टे:

शिक्षण आणि रोजगार: युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणे.

संवैधानिक अधिकार: संविधानाने दिलेल्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघटित लढा देणे.

सामाजिक सलोखा: द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध लढा देऊन सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे.

प्रत्यक्ष कृती: केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून प्रश्नांची सोडवणूक करणे.

पुण्यात होणार राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी मुस्लिम युवकांना एकत्र आणण्यासाठी लवकरच पुणे येथे एक भव्य राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात राज्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्या युवकांमध्ये समाजासाठी काम करण्याची जिद्द आहे, त्यांनी ‘सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र’ सोबत जोडावे, असे आवाहन संघटनेचे सचिव ए. एच. शेख यांनी केले आहे.


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!