इतरत्र सर्व काही सुरळीत चालू पण दोंडाईचा शहरात गॅस वितरण व्यवस्था कोलमडली..


 

दोंडाईचा : (संपादक-अशोक गिरासे)

दोंडाईच्यात गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा! नागरिकांमध्ये तीव्र असंतोष..

इतरत्र सर्व काही सुरळीत चालू पण दोंडाईचा शहरात गॅस वितरण व्यवस्था कोलमडली..

‘मे’च्या कडक उन्हात सिलेंडरसाठी जनतेची अक्षरशः होरपळ; प्रशासनाचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दोंडाईचा शहरात तब्बल ४७ हजारांहून अधिक गॅस कनेक्शन असल्याचे सांगितले जाते. मात्र, एका गाडीत अवघे ३७० सिलेंडर येत असल्याने नागरिकांना तासन्तास उन्हात उभे राहून सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

नागरिकांची प्रमुख मागणी :

✅ ग्रामीण आणि शहरी भागासाठी स्वतंत्र कार्यालय

✅ स्वतंत्र वाटप व्यवस्था

✅ नियोजनबद्ध वितरण प्रणाली

 

विशेष म्हणजे, गोडाऊनवर सिलेंडर घेतल्यास तो ९३३ रुपयांत मिळणे अपेक्षित असताना नागरिकांकडून ९५० रुपये वसूल केले जात असल्याची गंभीर तक्रार समोर येत आहे. दिवसभर उन्हात थांबूनही नागरिकांना योग्य सेवा मिळत नसल्याने संताप वाढत आहे.

 

नागरिकांचा आरोप असा की, ही परिस्थिती केवळ दोंडाईचा येथेच मोठ्या प्रमाणात दिसून येत असून इतर शहरांमध्ये अशी समस्या आढळत नाही. काही जण मुद्दाम कृत्रिम तुटवडा निर्माण करून अतिरिक्त पैसे कमावत असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

🗣️ एका नागरिकाची प्रतिक्रिया :

“३ एप्रिलला ऑनलाईन बुकिंग केले आहे, तरीही अजून सिलेंडर मिळालेला नाही. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावे.”

 

जनतेची मागणी आहे की, शासन आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!