धुळे| धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्व ५६ जागांवर विजय मिळवेल, असा ठाम विश्वास भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते वर्षभर जनतेत सक्रिय राहून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर असतात. याच जनसेवेच्या जोरावर जिल्हा परिषद व चारही पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा फडकेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. निवडणुकीच्या रणनीतीसाठी पालकमंत्री, आमदार व खासदारांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली असून, महायुतीसोबत लढायचे की स्वबळावर, याचा निर्णय ही समिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कापडणे गट हा भाजपचा बालेकिल्ला असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, शेतरस्ते आणि शाळा दुरुस्ती यांसारखी मोठी विकासकामे केल्यामुळे या गटातून आपण किंवा आपली पत्नी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही बापू खलाणे यांनी सांगितले.
सदर सविस्तर जे बी टीव्ही न्यूजवर…









