रावल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नाशिक, शिर्डी येथील हॉस्पिटल ला शैक्षणिक भेट
दोंडाईचा (प्रतिनिधी): स्वोधारक विद्यार्थी संस्थेचे राणीमासाहेब मनुबादेवी रावल नर्सिंग कॉलेज, दोंडाईचा धुळे येथील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच नाशिक येथील प्रसिद्ध ‘मानवता कॅन्सर हॉस्पिटला व बायो मेडिकल वेस्ट प्लांट म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाशिक, शिर्डी येथील साईनाथ किचन हॉस्पिटल व इतर नर्सिंगच्या क्षेत्रातील ठिकाणी शैक्षणिक भेट दिली. आ. जयकुमारजी रावल साहेब, मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या भेटीत विद्यार्थ्यांना कॅन्सर उपचारातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नर्सिंग केअरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपिका उत्तरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा यशस्वीरीत्या पार पडला. “केवळ वर्गातील शिक्षणाने नर्सिंगचा अभ्यास पूर्ण होत नाही, तर मानवता कॅन्सर हॉस्पिटल सारख्या मोठ्या संस्थेला भेट दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित होतात,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या शैक्षणिक दौऱ्यात महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे स्वोधारक विद्यार्थी संस्थेचे सचिव सी. एन. राजपूत, प्रशासकीय सचिव ललित कुमार गिरासे आणि असिस्टंट सेक्रेटरी आर. टी. गिरासे, असिस्टंट सेक्रेटरी डी. एन. जाधव यांनी कौतुक केले आहे.









