इंदौर बस सेवा सुरू करण्याची दोंडाईचा नागरिकांची मागणी


दोंडाईचा

– दोंडाईचा शहर व परिसरातील व्यापारी व प्रवाशांच्या सोयीसाठी दोंडाईचा ते इंदौर दरम्यान बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोंडाईचा आगर प्रमुख मिलिंद परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दोंडाईचा शहर व परिसरातील अनेक व्यापारी तसेच प्रवासी विविध कामांसाठी व व्यवसायाच्या निमित्ताने इंदूर येथे जात असतात. मात्र थेट बससेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी जादा भाडे द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांची आर्थिक गैरसोय होत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने सकारात्मक विचार करून दोंडाईचा ते इंदूर ही बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

सदर निवेदन महाराष्ट्र राज्य पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर नगरसेवक राकेश अग्रवाल, ललितकुमार रुणावल, गौतम माखिजा, कपिल सेनार, चेतन जैन, चंदन कोल्हे, योगेश लाडगे, संजय अग्रवाल, जयेश पाटील, कल्पेश धनगर, विशाल कोळी, महेंद्र जैन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!