जनता हायस्कूल व गायत्री माता प्री-प्रायमरी स्कूल शिंदखेडा येथे हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटे स्तब्धता


जनता हायस्कूल व गायत्री माता प्री-प्रायमरी स्कूल शिंदखेडा येथे हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटे स्तब्धता…

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० जानेवारी रोजी संपूर्ण देशभर हुतात्मा दिन पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने यावर्षी बुधवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री-प्रायमरी स्कूल, शिंदखेडा येथे हुतात्मा दिन मोठ्या आदरभावाने पाळण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सकाळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य एस. एस. पाटील, पर्यवेक्षक बी. जे. पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस. के. जाधव, डी. एच. सोनवणे, एस. ए. पाटील तसेच वरिष्ठ लिपिक किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
हुतात्मा दिनानिमित्त शाळेतील उपशिक्षक जतीन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना हुतात्मा दिनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मा बाबू गेनू यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी बाबू गेनू यांनी परदेशी मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसमोर स्वतःला आडवे घातले. त्या आंदोलनादरम्यान ट्रक त्यांच्या अंगावरून गेल्याने बाबू गेनू यांना वीरमरण आले, अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
हुतात्म्यांच्या बलिदानामुळेच आज देश स्वतंत्र आहे, त्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!