दोंडाईचा: महिला दिनानिमित्त महिलांसाठी भव्य ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन


उद्या ८ मार्च रोजी शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल स्टेडियमवर रंगणार कार्यक्रम; पैठणीसह आकर्षक बक्षिसांची लयलूट

दोंडाईचा : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दोंडाईचा शहरात महिलांसाठी मनोरंजन, स्पर्धा आणि सन्मानाचा अनोखा संगम असलेला भव्य ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोकनेते, विकासरत्न मा. सरकारसाहेब रावल यांच्या प्रेरणेने तसेच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल आणि दोंडाईचा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच दोंडाईचा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेविका तथा पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, दोंडाईचा यांच्या संस्थापक सौ. पुजा नितीन खडसे यांच्या पुढाकाराने महिलांच्या सन्मानार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दि. ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल स्टेडियम, दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे आयोजित करण्यात आला असून, शहरातील महिलांसाठी विविध रंजक खेळ, गप्पा, गाणी आणि मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लोकप्रिय शैलीतील ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा असून, या स्पर्धेत महिलांना आपली कला, चातुर्य आणि आत्मविश्वास दाखवण्याची संधी मिळणार आहे.

तसेच कार्यक्रमासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व ‘होम मिनिस्टर’चे भाऊजी पंकज यादव हे विशेष उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची रंगत अधिक वाढणार आहे.

🎁 स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे

  1. 🥇 प्रथम क्रमांक – पैठणी साडी व नथ
  2. 🥈 द्वितीय क्रमांक – ओव्हन
  3. 🥉 तृतीय क्रमांक – मिक्सर
  4. 🏅 चतुर्थ क्रमांक – डिनर सेट
  5. 🎖 पाचवा क्रमांक – इंडक्शन

याशिवाय कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी २० लकी ड्रॉ बक्षिसे ठेवण्यात आली असून, उपस्थित महिलांनाही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष आयोजन
  • महिलांसाठी गप्पा, गाणी व रंजक खेळांचा कार्यक्रम
  • ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेतून महिलांना आपली कला दाखवण्याची संधी
  • पैठणीसह अनेक आकर्षक बक्षिसांची व्यवस्था
  • २० लकी ड्रॉ गिफ्ट्सची खास योजना

26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!