नगरपंचायती व नगरपरिषदेसाठी निवडणुका जाहीर..!!


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिजुल वाजले..!

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक ही जाहीर झाली असून २ डिसेंबरला मतदान होणार तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने दिली आहे तसेच २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक ही राज्यात होणार आहे. सदर निवडणूकीत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार असणार असून दि.१० ते १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात तसेच मतदारांच्या सोयीसाठी नवीन मोबाईल ॲपची सुविधा देखील असणार आहे ज्यामुळे मतदारांचे यादीतील नाव मिळवणे सोपे होणार आहे.
या निवडणूकांमधून नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच नगरपंचायतीतील सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे, आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नामनिदेंशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ पर्यत आहे. अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होईल, तर अर्ज माघारी घेण्यासाठीची अंतिम मुदत २० नोव्हेंबरपर्यत ठेवण्यात आली आहे,
तसेच या निवडणुकीत २८८ निवडणूक अधिकारी असणार असून ७ नोव्हेंबरला मतदान याद्या प्रसिद्ध होणार आहेत. जे दुबार मतदार असतील यांच्या मतदान यादीत नावासमोर दोन स्टार असणार असून फक्त EVM द्वारे मतदान प्रक्रिया होणार असून VVPAT नसणार असल्याबाबत समजले आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५
छाननी- १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची मुदत- २० नोव्हेंबर २०२५
मतदान- २ डिसेंबर २०२५
मतमोजणी- ३ डिसेंबर २०२५

  • मुख्य संपादक जतीन बोरसे

26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!