भाजपा महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्षपदी माधुरी सिसोदे..!
तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका, नरडाणा येथील माधुरी मधुकर सिसोदे यांची जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे व महिला जिल्हाध्यक्षा धरती देवरे यांनी महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
माधुरी सिसोदे यांनी यापूर्वी भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष, दोंडाईचा कृ. उ. बाजार समितीच्या संचालक, नरडाणा ग्रामपंचायत सदस्या, वि.का.संस्थेच्या संचालक म्हणून कार्य केले आहे, सद्या त्या शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालिका आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल धुळे जिल्ह्यचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल, आ.अमरिशभाई पटेल, आ. राम भदाणे, आ.काशिराम पावरा, आ.अनुप अग्रवाल, माजी खासदार डाॅ.सुभाष भामरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, महिला जिल्हाध्यक्ष धरती देवरे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी जि.प.सभापती पंकज कदम, डि.आर.पाटील, आशुतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस डि.एस.गिरासे, दोंडाईचा तालुकाध्यक्ष दिपक बागल, शिंदखेडा तालुकाध्यक्ष मोतीलाल वाकडे, बाजार समितीचे उपसभापती डाॅ.आर.जी.खैरनार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्रावण आहिरे व संचालकांनी अभिनंदन केले.









