मालपूर येथे खोपडी एकादशी निमित्ताने विविध ठिकाणी तुलसी विवाह


शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विविध चौकात सामूहिक तुळसी मातेचे पूजन करून विवाह लावण्याची प्रथा आहे. मोरया हॉस्पीटल जवळच्या चौकात मालपूर ग्राम पुरोहित किशोर आप्पा पुराणीक यांनी तुलसी विवाह लावलेत. तुलसी पूजा करतांना श्री. योगेश सिताराम पाटील व त्यांची धर्मपत्नी सौ. यांनी खोपडीपूजन केली.
तुलसी ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाणारी वनस्पती आहे म्हणूनच प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असते.

या बाबती पुराणामध्ये एक दंत कथा सांगितली आहे ती – अशी शंखूड नावाच्या राक्षसाशी तुलसीचा विवाह लावण्यात आला होता. त्याच्या अत्याचारामुळे तुळशी माता त्रस्त होती. तिने भगवान विष्णुची तपस्या केली व त्यावेळी भगवान विष्णु तुलसी देवीला प्रसन्न झाले आणि वरदान दिले तू सतीयुगात माझी पत्नी म्हणून तूझी लोक अनन्य भावाने भक्ती करतील तुझे पूजन करतील. काही कालांतराने शंखचूड राक्षसाचा वध झाला. त्यावेळी तुलसी चे अश्रू पृथ्वीतलावर पडले तेथेच तुलसीवनस्पती उगवली तेव्हा पासून तुळशीला विष्णुपत्नी म्हणून मानली जाते तुलसी विवाह ही पद्धत रूढ झाली. म्हणून हिंदू धर्मात तुलसी विवाहानंतर मानव जातीचे लग्न समारंभ आरंभ होतात. .

प्रतिनिधी- प्रभाकर आडगाळे


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!