वंध्यत्वावर आयुवेर्दिक उपचार केल्यास मातृत्व मिळते दोंडाईचात रोटरी सिनियर्स व अहिंसा हाँस्पिटलतर्फे शिबिरात डॉ सुर्यकांत पाटील


दोंडाईचा ( अशोक गिरासे )

रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटल दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वंध्यत्व निवारण शिबिर रोटरी आय हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष रो प्रविण महाजन अहिंसा हाँस्पिटलचे चेअरमन रो राजेश मुणोत डॉ सुर्यकांत पाटील डॉ वैशाली पाटील डॉ निलेश गोरे इ मान्यवर उपस्थित होते .

     

  याप्रसंगी डॉ सुर्यकांत पाटील यांनी सांगितले की वंध्यत्व हि स्री व पुरुष दोघांमध्ये आढळणारी समस्या असुन मुळ कारणांवर आधारीत आयुवेर्दिक उपचार केल्यास अनेक दाम्पत्यांना गोड बातमी मिळुन कुटुंब सुखी झाल्याचे निदर्शनास आले आहे मुळात आजकाल विवाह उशीरा होणे योग्य वयात मुलं होऊ न देणे पी सी ओ एस ( गर्भाशयाच्या आतील भागात छोट्या छोट्या गाठी) शुक्राणुंची संख्या कमी किंवा नसणे गर्भनलीकेत अडथळा युटेरियन फायब्राइड ( गर्भाशयाच्या गाठी ) इ सर्व समस्यांवर आयुवेर्दिक उपचार प्रभावी ठरत कुटुंबाला गोड बातमी मिळते असे प्रतिपादन डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटलचे डॉ सुर्यकांत पाटील यांनी केले .

 

शिबिरात वंध्यत्वावर मात करण्यासाठी ४० दाम्पत्यांना तपासणी करुन मोफत मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटल येथे पाठविण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष रो प्रविण महाजन रो राजेश मुणोत रो डॉ मुकुंद सोहनी सौ अनुराधा सोहनी रो कमलेश कांकरिया रो दिनेश कर्नावट अहिंसा हाँस्पिटलचे एस पी पाटील विजय निकुंभ सर्व प्रशिक्षाणार्थी डॉक्टर रोटरी आय हॉस्पिटलचे व्यवस्थापक गणेश चकणे प्रव्हादसिंग गिरासे शोभा पटेल इ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!