दोंडाईचा (प्रतिनिधी-✍️श्री.पांडुरंग शिंपी)
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जीतो लेडिज विंग, दोंडाईचा यांनी ड्राइव्ह विथ परपज उपक्रमाच्या निमित्ताने समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कॅन्सर व थॅलेसीमिया जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शहरातील सुमारे २१–२२ महिला मंडळे व विविध महिला संघटनांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात शहरात जनजागृती रॅली काढून करण्यात आली. या रॅलीत सुमारे शंभर पेक्षा अधिक महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून जनतेपर्यंत आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश पोहोचविण्यात आला. तसेच वसुधा पब्लिक स्कूल, दोंडाईचा च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी नुक्कड नाटकाद्वारे कॅन्सर व थॅलेसीमिया या आजारांबाबत लवकर तपासणी, प्रतिबंध आणि जनजागृतीचे महत्त्व समाजासमोर मांडण्यात आले.
यानंतर हस्ती सहकार दीप, दोंडाईचा येथे आयोजित मार्गदर्शन सत्रात पारख हाॅस्पीटल प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. नेहा पारख आणि डॉ. अनीकेत पाटील यांनी या आजारांची लक्षणे, प्रतिबंध, उपचार तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला दीडशे हून अधिक महिलांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
हा संपूर्ण जनजागृती कार्यक्रम जीतो लेडिज विंग दोंडाईचा यांच्या चेअरपर्सन सुगंधा जैन, हर्षा कांकरिया, सपना जैन, नम्रता कवाड़, पूनम बाफना, कल्याणी मुनोत व ममता गोलेछा यानी विशेष मेहनतीने आणि नियोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमासाठी कॉन्व्हेनर्स सुवर्णा रुणवाल व सीमा खिवसरा हे होते
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व महिलांनी एकत्र येऊन स्नेहपूर्वक अल्पोपहार घेतला आणि कार्यक्रमाचा आनंद लुटला. शेवटी आभार प्रदर्शन कल्याणी मुनोत व ममता गोलेच्छा यांनी केले.
तसेच हस्ती बँकेचे चेअरमन कैलाश जैन यांनी कार्यक्रमासाठी हस्ती बँकेचा हॉल उपलब्ध करून दिला तसेच नेहमीप्रमाणे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, नियमित तपासणीस प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा होता. कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.









