साक्री येथील भांडणे शिवारात बिबट्याने दुचाकी स्वारावर घेतली झडप…
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील भांडणे शिवारात बिबट्याने एका दुचाकी स्वारावर झडप घालत जखमी केले आहे. भांडणे गावाकडून नांदवण गावाकडे दुचाकीवरून जात असताना आशापुरी मंदिराजवळ बिबट्याने अचानक हल्ला केला, या हल्ल्यात हर्षल शेवाळे व ज्ञानेश्वर बिचकुले हे दोघेही जखमी झाले आहेत. तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र साक्री येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिसरात बिबट्याची दहशतीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांनी बिबट्याला पकडण्याची वनविभागाकडे मागणी केली आहे…
-संपादक- जतीन बोरसे-
Views: 212









