संजय चंदने यांना राज्य शिक्षक परिषदे तर्फे राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार प्रदान..!!


महाराष्ट्र राज्य महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक परिषद २०२५ रत्नागिरी येथे दिग्दर्शक / गायक प्राचार्य संजय चंदने यांना ‘कलारत्न’ राष्ट्रीय पुरस्कार विशेष अतिथीँच्या उपस्थितीत च्या हस्ते प्रदान..!!

महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिराव फुले १५ वी राज्यस्तरीय शिक्षक परिषद व पुरस्कार सोहळा २०२५ आयोजित कोकण रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ‘कलारत्न’ हया राष्ट्रीय पुरस्काराने दिग्दर्शक / गायक प्राचार्य श्री. संजय चंदने ,स्वो वि संस्थेचे,आर.डी.एम.पी. हायस्कूल जुनिअर कॉलेज दोंडाईचा व सौ. वैशाली संजय चंदने यांना सन्मानित करण्यात आले. मुख्य अतिथी ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, उपस्थित मान्यवर गिरीशभाऊ जाधव प्रदेशाध्यक्ष कुणबी मराठा महासंघ, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद , प्रा. शिवाजी शिंदे, प्रताप सरदार, रुद्राक्ष चंदने उपस्थित होते .
धुळे जिल्ह्यातून संजय चंदने यांना कलारत्न पुरस्कार मिळाल्याबाबत स्वो.वि.संस्थेचे अध्यक्ष विकासरत्न श्रीमान सरकारसाहेबजी रावल , मंत्रीमहोदय ना. श्रीमान जयकुमारभाऊजी रावल , सचिव सी.एन.राजपूत , प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहे .
संस्थेचे सहाय्यक सचिव आर. टी.गिरासे, डि. एन.जाधव तसेच संस्थेच्या आर.डी.एम.पी. हायस्कूल व ज्यू. कॉलेजच्या सर्व सहकारी तसेच इतर सर्व मित्र परिवार यांनी संजय चंदने यांचे अभिनंदन केले आहे

_मुख्य संपादक जतीन बोरस_


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!