शिंदखेडा बस स्थानकावर धक्कादायक घटना- वृध्द महिला गंभीर..!!
शिंदखेडा शहरातील बस स्थानकाच्या जीर्ण इमारतीची स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने वृद्ध महिला जखमी झाली आहे. तालुक्यातील आरावे येथील बेबाबाई कौतिक आखाडे अंदाजे वय 65 वर्षे असून सदर वृद्ध महिला गावाची बसची वाट पाहत आसनावर बसली असता अचानक स्लॅब चे प्लास्टर कोसळले आणि त्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. नुकतेच शिंदखेडा बस स्थानकाचे काँक्रिटीकरणाचे उत्कृष्ट काम झाले परंतु इमारत तशीच जीर्ण अवस्थेत राहू दिल्याने हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तात्काळ वृद्ध महिलेला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालय धुळे येथे हलविण्यात आले आहे.
बस स्थानकावरील याच आसनावर अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या प्रमाणावर बसत असतात. कदाचित येथील प्लास्टरचा मोठा तुकडा जर एखाद्या लहान बालकावर पडला असता तर मोठी दुर्घटना देखील घडली असती. व त्यास जबाबदार कोण राहिले असते असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित झाला आहे
आता तरी महामंडळ प्रशासनाने या जीर्ण इमारतीचे नूतनीकरण करावे अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांसह नागरिकांनी केले आहे
_मुख्य संपादक जतीन बोरसे_









