शिंदखेडा- जनता हायस्कूल शिंदखेडा येथे सरदार पटेल वल्लभभाई पटेल यांना अभिवादन


शिंदखेडा || जनता हायस्कूल, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली असून जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन उपशिक्षक जे. डी. बोरसे यांनी घेतले असून स्व. बँकिंमचंद्र चट्टोपाध्याय रचित वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला आज 31 ऑक्टोबर 2025 रोजी तिथीनुसार 150 वर्ष पूर्ण झाले इत्यादी माहिती यावेळी स्पष्ट दिली
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले .त्यानंतर एकात्मता दिनाचे महत्त्व एस. ए. पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील होते तसेच पर्यवेक्षक बी.जे .पाटील, वरिष्ठ शिक्षक एस. के. जाधव डी. एच. सोनवणे, एस. ए. पाटील, जे. डी. बोरसे व वरिष्ठ लिपिक किशोर पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


26
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!