शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक मतदार याद्यामध्ये घोळ- मुख्याधिकारी यांना दिले निवेदन


    शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक लवकरच लागणार असून पूर्वतयारी शासकीय स्तरावर सुरु आहे प्रभाग रचना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्याप्रमाणे होती त्यात बदल जाहीर झाला आहे तर मतदार याद्यांबाबत त्यातील नावे याबाबत हरकत मागवण्याची मुदत देण्यात आली होती याप्रसंगी प्रत्येक प्रभागाबाबत आपले नाव कुठे अपेक्षित असावे असा संदर्भ होता त्यात मतदारांनी हरकती घेऊन आपले नाव स्वतःच्या प्रभागात असण्याबाबत हरकतीं विहित नमुन्यात सादर केल्या याबाबत नगरपंचायत प्रशासनाने पथक तयार करून संबंधित मतदारांकडे घरी जाऊन पंचनामे व चौकशी केली होती मात्र अंतिम यादी जाहीर झाली असता मतदारांच्या मागणी नुसार काही मतदारांचा बदल झाला नाही त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला यांस कारण नगरपंचायतीत कामं करणाऱ्या सेवक वर्गाचा दोष असल्याचे समजले, कारण मराठीत लिहिलेला एक त्यासं इंग्रजी मधील नऊ म्हणून त्यास कारणीभूत ठरले असल्याचे समजले त्यात प्रा. प्रदीप दीक्षित यांचा प्रभाग ९ ऐवजी थेट १ झाला असून मोठे आश्चर्यच घडले आहे वास्तविक पंचनाम्याप्रसंगी त्यांनीच तसे आकडे लिहिले यातून नगरपंचायत कर्मचारी अशिक्षित असावे काय..? असा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना प्रभाग बदल झाल्याबाबत यावेळी निवेदन देतांना व्हाईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष प्रदीप दीक्षित

मुख्य संपादक जतीन बोरसे


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!