परसुळे (ता शिंदखेडा) :येथे जिल्हा परिषद शाळा येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थी यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तरी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गावातील सुपुत्र सेवानिवृत्त शिक्षक वासु आप्पा पाटील ( V G patil ) यांनी व कर्ले येथील सेवानिवृत्त लिपिक आर के पाटील आणि भाजपा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष इंजिनिअर विष्णू पाटील यांनी उपस्थिती दिली व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गावातील माध्यमिक शिक्षक मोहन पाटील (M S patil) यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. कोकीळा मोहन पाटील यांनी केले महत्वाचे म्हणजे फेब्रुवारी महिन्यात पवन दवंडे यांचा समाज प्रबोधनावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ‘आम्ही परसुळेकर’ गावकरी मंडळी व सुनिल दाजभाऊ पाटील यांच्या सौजन्याने या कार्यक्रमासाठी देणगीदारांनी जी देणगी दिली होती त्या देणगीतून उर्वरित देणगी रक्कमेतुन येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तर देण्यात येणार आहे व जे पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतील त्यांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्यात येईल असा निर्णय विद्यमान सरपंच प्रतिनिधी MS patil यांनी घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सुजाण नागरिकांनी परिश्रम घेतले जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका शिक्षिका वाणी मॅडम व उपशिक्षिका माळी मॅडम यांनी कार्यक्रमासाठी खुप मेहनतीने लहान मुलांना मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना स्टेजवर आत्मविश्वास वाढविला दोघीशिक्षिकांचे आम्ही परसुळेकर ग्रामस्थांनी आभार मानले








