दोंडाईचा: वणी येथील कुटुंबांचे रेशन कार्ड ऑनलाईन पोर्टलवर नाशिकवरून धुळे (वणी) येथे वर्ग करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन


दोंडाईचा(प्रतिनिधी): शिंदखेडा तालुक्यातील जिल्ह्याच्या येथे आदिवासी टायगर सेना च्या वतीने दोंडाईचा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,वणी गावातील दोन गरजू कुटुंबांच्या रेशन धान्याबाबतची गंभीर समस्या निदर्शनास आणून देत आहे.
वणी (ता. शिंदखेडा) येथील दोन मजूर कुटुंबे असून, त्यांचे सर्व अधिकृत दस्तऐवज (आधार कार्ड, रहिवासी पुरावा इ.) वणी गावचेच आहेत. ही कुटुंबे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन पोर्टलवर सध्या ‘नाशिक’ जिल्ह्यांतर्गत दिसत आहे.
या तांत्रिक त्रुटीमुळे आशा या कुटुंबांना वणी येथील रास्त भाव दुकानातून नियमित धान्य मिळत नाहीये. मजुरी करून पोट भरणाऱ्या या गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तरी प्रशासकीय स्तरावर दखल घेऊन, सदर कुटुंबांचे रेशन कार्ड ऑनलाईन रेकॉर्डवरून नाशिक येथून कमी करून आपल्या शिंदखेडा तालुक्यातील वणी गावाच्या रेकॉर्डला लवकरात लवकर जोडण्यात यावे, जेणेकरून त्यांना हक्काचे धान्य मिळणे सुरू होईल. याबाबतचे निवेदन आदिवासी टायगर सेना दोंडाईचा यांच्यावतीने देण्यात आले.
यावेळी दोंडाईचा शहर अध्यक्ष कृष्णा मालचे ,दोंडाईचा शहर उपाध्यक्ष विशाल सोनवणे ,दोंडाईचा शहर उपाध्यक्ष आजय बागुल ,दोंडाईचा शहर सचिव सागर मालचे ,विजय ठाकरे ,रोहित सोनवणे, करणं तिसे ,अजय शिंदे, प्रकाश चित्ते ,पंकज ठाकरे, खंडू धनगरी ,गणेश ठाकरे ,कृष्णाची अजय ठाकरे ,विकास ठाकरे ,रविन सोनवणे ,आनंद मालचे ,सोमनाथ सोनवणे ,सागर तिसे ,गणेश मालचे ,विजय शिंदे आधी आदी उपस्थित होते.

✍️श्री. पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!