महिला दिनानिमित्त दोंडाईच्यात ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग


जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा शहरात महिलांसाठी अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण असा ‘होम मिनिस्टर’ विशेष कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.

दोंडाईचा शहरातील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी विविध सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जात आहेत. त्याच परंपरेला पुढे नेत यंदाही ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास “ होम मिनिस्टर” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दोंडाईचा येथील शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल स्टेडियम येथे संध्याकाळी सहा वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

महिलांना मनोरंजनासोबतच आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच उत्कृष्ट नियोजन आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक तसेच नगरसेविका सौ. पुजा नितीन खडसे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

'होम मिनिस्टर' कार्यक्रमाविषयी सविस्तर बातमी पहाण्यासाठी फोटोवर क्लिक करा.
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाविषयी सविस्तर बातमी पहाण्यासाठी फोटोवर क्लिक करा

होम मिनिस्टर 

     या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विकासरत्न सरकारसाहेब रावल तसेच दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांची उपस्थिती लाभली.

तसेच लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक आणि लेखक पंकज भाऊजी यादव हे देखील विशेष उपस्थित होते. त्यांच्या मनोरंजक आणि प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली.

कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. म्हणी, गप्पा, गाणी आणि रंजक खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसाठी आकर्षक पैठणीसह विविध भेटवस्तूंचीही व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे महिलांचा उत्साह आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले.

दोंडाईचा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह महीला पदाधिकारी, नगरसेविकांनी देखील कार्यक्रमात सहभागी होत महिलांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.

कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरांवरील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमामुळे दोंडाईचा शहरातील महिलांना आनंदाचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय अनुभव मिळाला.

महिलांच्या मोठ्या सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी JB NEWS शी मान्यवरांनी संवाद साधला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, गटनेते निखिल जाधव, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, जि.प. माजी महिला व बालकल्याण सभापती संजिवनी सिसोदे, चंद्रकला सिसोदिया, पालिकेच्या सभापती अपूर्वा चौधरी, वैशाली कागणे, सरला सोनवणे, नगरसेविका ललिता गिरासे, भारती मराठे, देवयानी रामोळे , वैशाली महाजन, सुवर्णा बागुल, रोहिणी लिंभारे, नगरसेवक अक्षय चव्हाण, चतुर पाटील, सरजू भील, उद्योगपती रतनलाल कोठारी, नयन बाफना, विजय मराठे, प्रवीण महाजन, राकेश अग्रवाल, छोटू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.


23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!