भडणे- आदर्श पोलीस पाटील युवराज माळी यांच्यातर्फे डाबली ते विखरण पायवारी करणाऱ्या भाविकांचा सत्कार व सन्मान


दर १५ दिवसांनी पायवारी करणारे म्हटला म्हणजे भक्ती निश्वार्थ हरी नामाची सेवा नियमित भगवंताचे नाम व दर्शन व अखंड पायवारी यांच्यात मिळणारा आनंद हाच वारकऱ्यांचा भक्ती भाव दिसून येतो शिंदखेडा तालुक्यातील डाबली, धादरणे येथील वारकरी व भाविक तब्बल १५ वर्षापासून नियमितपणे दर १५ दिवसांनी एकादशीला डांबली ते विखरण नियमित पायवारी करणारे वारकरी खांद्यावर भगवा ध्वज, गळ्यात टाळ सोबतीला मृदंग व विना घेऊन तब्बल २० किमीचा पायी वारीचा प्रवास करत असतात.
होळ, चिरणे – कदाने, भडणे व सोनसेलू मार्गे विखरण असा २० किमी अंतर दर १५ दिवसांनी एकादशीच्या दिवशी नेहमीच असतो. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तीनही ऋतूंमध्ये या गावातील वारकरी कितीही परिवारात संकटे दुःख तसेच शेतीची कामे असो ती बाजूला ठेवून अखंड नियमित पायवारी या भाविकांनी नियमितपणे ठेवली असून त्यांच्या सन्मानार्थ व कौतुकास्पद भडणे येथील राज्यपाल पुरस्कार प्राप्त, आदर्श पोलीस पाटील युवराज माळी यांनी भडणे येथे एकादशीच्या दिवशी डाबली – धादरणे येथील वारकरी भाविकांचा रुमाल, टोपी, शाल, पुष्पगुच्छ, नारळ व फराळ देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला असून या अभिनव उपक्रम उपक्रमाबद्दल परिसरातुन कौतुक करण्यात येत आहे यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी, शिंदखेडा वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, माजी सरपंच सुशीला माळी, पिंटू पाटील, सोनू पाटील, दादा पाटील व ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते

  1. मुख्य संपादक जतीन बारसे

23
कृपया वोट करा

JB NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!